About Us

थोडं एकसंघा बद्दल..

27 डिसेंबर 2024 पंढरपूर केशवराजांच्या मंदिरात श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघाच्या स्थापनेचा संकल्प झाला व 25 जून 2025 रोजी एकसंघ अधिकृतरित्या स्थापन झाला.

श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांनी अखंड भारतभर व त्या वेळच्या सिंध प्रांतापर्यंत भागवत धर्माचा,वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. संत नामदेव महाराजांना अनुसरून अखंड भारतातील नामदेव भक्त, शिंपी समाज व त्यातील पोट जाती यांना एकत्र आणणे व समाजाचे हित हा उद्देश श्री संत नामदेव क्षत्रिय एकसंघाचा आहे.

शिंपी समाजातील पोटजातींमध्ये रोटी बेटी व्यवहार सुरू करून सर्वांना एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न एकसंघाचा असेल.
नामदेव, अहिर,वैष्णव,भावसार, माहेश्वरी मेरू, दर्जी, रोहिला, टाक ,छिपां, रंगारी, बुनकर, यासंह अन्य पोटजातींना एकत्र आणण्याचा दृढ संकल्प असेल.
समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक, शैक्षणिक, वैद्यकीय दृष्ट्या मदत करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एकसंघ प्रयत्न करेल.
हुशार होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
सुशिक्षित बेरोजगार वर्गासाठी वेगवेगळ्या माध्यमातून रोजगार निर्मितीची संधी उपलब्ध करून देणे.
महिला सबलीकरण, बचत गटासारख्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देऊन महिलांचे सक्षमीकरण करणे.
समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे वसतिगृह स्थापन करणे.
समाजातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असणाऱ्या तसेच ज्या मुलींना पालकत्व नसेल अशा मुलींचे विवाह योजनेअंतर्गत विवाह करण्याचा अभिनव उपक्रम.
शासकीय स्तरावर समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेऊन पाठपुरावा करणे.
जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी संत नामदेव महाराजांचे भव्य मंदिर उभारण्याचा देखील विचार आहे.

एकूणच महात्म्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करणे इथपर्यंत मर्यादित न राहता श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांची शिकवण लक्षात ठेवून समाज हिताचे उपक्रम एकसंघाच्या माध्यमातून बहुआयामी प्रकल्पाद्वारे राबवणे हा एकसंघाचा मानस असणार आहे.
जय नामदेव